Posts

घर

Image
किती स्वप्न असतात न आपलं स्वतःचं घर असावं तसच तुम्ही पण बघितली असतील न स्वप्न ती पूर्ण पण केलीत तुमचा मेहनतीने जिद्दीने आज तोच घर आम्हाला असरा देतोय तुम्ही करतात तशी माया करतोय तुम्ही ठेवत होतात तशी सुखरूप असण्याची जाणीव करून देतोय किती आवडीने रंग बदलली या घराची मी लहानाची मोठे झाले इथे आपले सगळे सुख दुःख याच घरा ने बघितले मी कधीच कल्पना केली नव्हती तुमचा वीणा मला इथ राहावं लागेल मला आठवतंय मी सुट्टी घेऊन परत आले होते आणि तुम्ही घराला तुमचा मताप्रमाणे सजवत होता रंग दिले, काही बदल ही केलेत सगळ्या सोयी नीट केल्या जणू जाणवत होत तुम्हाला की तुम्ही गेल्यावर हे सगळ मला अवघड होईल आणि झालं ही पण मी पण तुमची लेक आहे या घराचं घरपण मी कधीच हरवू दिलं नाही आजही तुम्ही या घरात जिवंत असल्याची जाणीव होते तुमचे हास्य अजूनही आहे तुमचे शब्द या भिंतींनी आपल्यात सामावलेले आहेत आपल्या गोड आठवणी आहेत तुम्ही सोडून गेलात तसाच ठेवलंय सगळ नीट नेटकं बरं का तसच आहे सगळ अस वाटतं तुम्ही येणार बघायला या जमत असेल तर रंग तसाच आहे अजून तुम्ही करून गेलात तसाच आपली बाग पण बहरलेली आहे पण तुम्हीच हरवलात कुठे तरी... कुठ...

पितृ दिन

एक दिवस अचानक माझे बाबा गेले कुठलीच मनाची तयारी नसतांना, ना आजाराचा सांगावा, ना शरीर जीर्ण झाल्याचे संकेत तरीही... ते गेलेत.. आई रडली, बहिण ओरडली 'जग सारं संपलं' म्हणाली आणि म्हणाली, ‘वाचा बंद झाली कान बहिरे झालेत, नजर गेली सर्व सर्व संपलं....’ नंतर शांत होऊन झोपली. कारण ती ओरडली, रडली व्यक्त झाली परत मला जाणीव झाली अचानक माझे बाबा गेले... बहिणीचे शुष्क डोळे आमच्या पाठीशी कायमची झालेली पोकळी भविष्याचे विस्कटलेले धागेदोरे हो, हा गुंता सोडवण्यात मी हरवली मी रडली नाही, ओरडली नाही बाबा अजून स्मशानात जळायचाच होता पण, एव्हाना जग बदललं होतं आमचं अनाथपण घालवायला डोक्यावरून हात फिरवायला कुणीच नव्हतं... होते ते फक्त अनाथपण आपण किती एकटे असतो हे सत्य सांगणारं मरण आणि बापासोबत माझ्यातला हळवेपणा जाळणारं सरन अखेर... रात्री मी ही झोपली आई, बहिण झोपली पण एवढ्या रजईतही आम्ही थरथरत होतो का??? का???? आमचं पांघरूण हरवलं होतं... आमची बाप नावाची रजई जळाली होती.. असच अचानक माझे बाबा गेले आम्हाला अनाथ करून गेले... वर्ष पूर्ण झालं प्रत्येक क्...

बाबांचं प्रेम

Image
बाबा तुमच्या प्रेमाची सर कशालाच येत नाही, आयुष्यात तुमची जागा कुणीच घेत नाही. विचार येतात मनात सतत आज तुम्ही असतास तर कसं असतं, अस असतं , तसही असतं, सारं कसं ना सोप्पं असतं. मनात आलेती गोष्ट लगेच मी तुम्हाला बोलले असती. माझा मनातली घालमेल तुम्हाला सुद्धा बघवली नसती. निस्वार्थ प्रेम असतं, खरीखुरी काळजी असती. न सांगता सुखं दुःख माझी फक्त तुम्हालाच कळाली असती. इतरांसारखी मी ही मनमुराद स्वप्न बघितली असती. ती पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची हिम्मत पाठीशी असती. मी ही माझा यशाने तुमच आयुष्य आनंदमयी केलं असतं. तुम्ही निवृत्त झाल्यावर मी माझे मोठे झाले असते. तुम्हाला सोडून खंबीर होण्याचे दिवस आले नसते. विसवाच्या काळात आता माझाबरोबर राहायचं असा हट्ट धरला असता. तुमच्याशी संवाद थट्टा करत आपला वेळ सरला असता. तुम्ही असता तर मी लहानाचे मोठे झालेच नसते. तुम्च्याविणा जबाबदाऱ्या सांभाळण्याची वेळ आली नसती. तुमचा लेकीला घालून बोलायची कुणाची हिंमत झाली नसती. सारं केलं तरी नाही केल्याची जाणीव कुणी करून दिली नसती. ना जगण्याची भीती असती ना जगाची धास्ती असती. आता साऱ्यांना कसं बोलायला...

२०२०- काळा वर्ष

2020 माझा आयुष्यातील काळा वर्ष या वर्षांतील एक ही दिवस मी सुखाचे पाहिले नाहीत आनंदाची भीती वाटायला लागली आहे या काळाने माझा आयुष्यातील माझी सगळ्यात जवळची व्यक्ती हेराऊन घेतली माझा जिवलग असलेल्या सर्वांना मझापासून हेरावल एका पाठोपाठ एक संकटे कोसळत गेली त्या संकटाना सामोरे जात मी आनंदी रहायचेच विसरले एक ही क्षण विसावा नको की शांती नको अश्रू गळायला वेळ सुद्धा नशिबी नाही दुःख सांगावस वाटत, पण वाटून घ्यायला सोबत कुणीच नाही आयुष्याच्या परीक्षे चा काळात मी एकटी पडलीय मदतीचं हाक मारायला म्हणून जवळचं कुणी दिसत नाही मुखोट्यांची धास्ती बसलीय कुणावर विश्वास ठेवायचा कळेनासं झालंय दगा करणारे शेकडो आहेत मदतीला धावणारे कमीच संधीच सोण करणारे तर त्याहूनही अधिक धीट होतेच... पण परिस्थितीमुळे आणखी धीट झाले मातीचा गोळा होते...बाबांनी साकारल.. नी घडवलं त्यांना जसं घडवायचं त्यांचीच सावली बनुन राहिले काळाने मात्र मातीचा दगड केलाय भावना हीन झाले... आता बाकीचे दुःख शुल्लक वाटतात स्वतः ला दुनियेचा काळ या नाझरेवाचून सुखरूप ठेवायचे शिकले शरीराची दमछाक झाली तरी कामे पूर्णत्वाला न्यायाचे समजले प्रेमाने वागून चालणा...

बाबा

एक दिवस अचानक माझा बाबा मेला कुठलीच मनाची तयारी नसतांना, ना आजाराचा सांगावा, ना शरीर जीर्ण झाल्याचे संकेत तरीही... तो गेला.. आई रडली, बहिण ओरडली 'जग सारं संपलं' म्हणाली आणि म्हणाली, ‘वाचा बंद झाली कान बहिरे झालेत, नजर गेली सर्व सर्व संपलं....’ नंतर शांत होऊन झोपली. कारण ती ओरडली, रडली व्यक्त झाली परत मला जाणीव झाली अचानक माझा बाबा मेला... बहिणीचे शुष्क डोळे तिच्या पाठीशी कायमची झालेली पोकळी तिच्या भविष्याचे विस्कटलेले धागेदोरे हो, हा गुंता सोडवण्यात मी हरवली मी रडली नाही, ओरडली नाही बाबा अजून स्मशानात जळायचाच होता पण, एव्हाना जग बदललं होतं आमचं अनाथपण घालवायला डोक्यावरून हात फिरवायला कुणीच नव्हतं... होते ते फक्त अनाथपण आपण किती एकटे असतो हे सत्य सांगणारं मरण आणि बापासोबत माझ्यातला हळवेपणा जाळणारं सरन अखेर... रात्री मी ही झोपली आई, बहिण झोपली पण एवढ्या रजईतही आम्ही थरथरत होतो का??? का???? आमचं पांघरूण हरवलं होतं... आमची बाप नावाची रजई जळाली होती.. असाच अचानक माझा बाबा मेला आम्हाला अनाथ करून गेला... #संकलित माझा परिस्थितिशी मेळ खाणारी कविता 😢😢😢😢

अबोल मनातले

Image
  कितीतरी बोलायचं राहुनी गेलं ओठांवर येऊनही ओठात राहिलं कितीतरी स्वप्ने राहुनी गेली माझ्यापासून दूर जणू माझी सावली गेली कितीतरी इच्छा मरुनी गेल्या उरल्या त्या अपेक्षाही  माझा  निसटून गेल्या आपले म्हणून जवळ कुणीच नाही राहिले आयुष्याचा चौकटीत मी मला एकटीच पाहिले वारंवार अविश्र्वासाच्या नवीन जखमा दिल्या मनातील जुन्या आठवणी उसवल्या गेल्या प्रेमाने जवळ करून त्याला मी  स्वतःच हरपून बसले होते ते चांगले दिवस ही आज माझावर रुसले पाठ फेरून माझ्यापासून बदललेली त्याची वाट अश्रूंनी ओल्या पापण्यानी उघडते माझी पहाट माझ्यावर ओसळला दुष्काळ तरी त्याने भरभरून बहराव आयुष्याचा वेलीवर त्याचा पदरी सुखद फुलांच सतत पाऊस पडावं व्याकुळ नेहमीच असेन मी परत त्याचा भेटीची कधीच तुलना होणार नाही कुणाशीच त्याच्या प्रितीची वाटायचं मला , त्यानी वाटेत हाथ माझं धरावं दोघांनी मिळून यशाची शिखर गाठावं सुख असो वा दुःख मिळुनी सामोरं जावं एकमेकांच्या सहवासात आयुष्य  हे जगावं परंतू आयुष्य हे नेहमीच सुखद आणि सोपं नसत ज्याची साथ जितकी त्यातच सुख मानायच असत निघून गेला जरी तरी हृदयात होणार  नेह...

Ek rishta hi tha tut gaya

 ek khushi thi jo ruth gai ek vishwas tha jo uth gaya ek rishta hi tha jo tut gaya ek dil hi toh tha jo tut gaya ek sath tha tera  jo chut gaya ek rishta hi tha jo tut gaya ek sach hi tha jo jhoot hua ek apna hi tha ..paraya bnkr ruth gaya ek rishta hi tha jo tut gaya ek dor hi thi bndhi jo chut gai ek sapna hi tha wo bhi tut gaya sabse pyara  rishta  tha  mera jo tut gaya ek dariya tha mohabbat ka beh  gaya ek mehal tha apno ka deh gaya mera fil hi toh tha bewafayi seh hi gaya _Nidhi$