Posts

Showing posts from February, 2021

बाबांचं प्रेम

Image
बाबा तुमच्या प्रेमाची सर कशालाच येत नाही, आयुष्यात तुमची जागा कुणीच घेत नाही. विचार येतात मनात सतत आज तुम्ही असतास तर कसं असतं, अस असतं , तसही असतं, सारं कसं ना सोप्पं असतं. मनात आलेती गोष्ट लगेच मी तुम्हाला बोलले असती. माझा मनातली घालमेल तुम्हाला सुद्धा बघवली नसती. निस्वार्थ प्रेम असतं, खरीखुरी काळजी असती. न सांगता सुखं दुःख माझी फक्त तुम्हालाच कळाली असती. इतरांसारखी मी ही मनमुराद स्वप्न बघितली असती. ती पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची हिम्मत पाठीशी असती. मी ही माझा यशाने तुमच आयुष्य आनंदमयी केलं असतं. तुम्ही निवृत्त झाल्यावर मी माझे मोठे झाले असते. तुम्हाला सोडून खंबीर होण्याचे दिवस आले नसते. विसवाच्या काळात आता माझाबरोबर राहायचं असा हट्ट धरला असता. तुमच्याशी संवाद थट्टा करत आपला वेळ सरला असता. तुम्ही असता तर मी लहानाचे मोठे झालेच नसते. तुम्च्याविणा जबाबदाऱ्या सांभाळण्याची वेळ आली नसती. तुमचा लेकीला घालून बोलायची कुणाची हिंमत झाली नसती. सारं केलं तरी नाही केल्याची जाणीव कुणी करून दिली नसती. ना जगण्याची भीती असती ना जगाची धास्ती असती. आता साऱ्यांना कसं बोलायला...

२०२०- काळा वर्ष

2020 माझा आयुष्यातील काळा वर्ष या वर्षांतील एक ही दिवस मी सुखाचे पाहिले नाहीत आनंदाची भीती वाटायला लागली आहे या काळाने माझा आयुष्यातील माझी सगळ्यात जवळची व्यक्ती हेराऊन घेतली माझा जिवलग असलेल्या सर्वांना मझापासून हेरावल एका पाठोपाठ एक संकटे कोसळत गेली त्या संकटाना सामोरे जात मी आनंदी रहायचेच विसरले एक ही क्षण विसावा नको की शांती नको अश्रू गळायला वेळ सुद्धा नशिबी नाही दुःख सांगावस वाटत, पण वाटून घ्यायला सोबत कुणीच नाही आयुष्याच्या परीक्षे चा काळात मी एकटी पडलीय मदतीचं हाक मारायला म्हणून जवळचं कुणी दिसत नाही मुखोट्यांची धास्ती बसलीय कुणावर विश्वास ठेवायचा कळेनासं झालंय दगा करणारे शेकडो आहेत मदतीला धावणारे कमीच संधीच सोण करणारे तर त्याहूनही अधिक धीट होतेच... पण परिस्थितीमुळे आणखी धीट झाले मातीचा गोळा होते...बाबांनी साकारल.. नी घडवलं त्यांना जसं घडवायचं त्यांचीच सावली बनुन राहिले काळाने मात्र मातीचा दगड केलाय भावना हीन झाले... आता बाकीचे दुःख शुल्लक वाटतात स्वतः ला दुनियेचा काळ या नाझरेवाचून सुखरूप ठेवायचे शिकले शरीराची दमछाक झाली तरी कामे पूर्णत्वाला न्यायाचे समजले प्रेमाने वागून चालणा...

बाबा

एक दिवस अचानक माझा बाबा मेला कुठलीच मनाची तयारी नसतांना, ना आजाराचा सांगावा, ना शरीर जीर्ण झाल्याचे संकेत तरीही... तो गेला.. आई रडली, बहिण ओरडली 'जग सारं संपलं' म्हणाली आणि म्हणाली, ‘वाचा बंद झाली कान बहिरे झालेत, नजर गेली सर्व सर्व संपलं....’ नंतर शांत होऊन झोपली. कारण ती ओरडली, रडली व्यक्त झाली परत मला जाणीव झाली अचानक माझा बाबा मेला... बहिणीचे शुष्क डोळे तिच्या पाठीशी कायमची झालेली पोकळी तिच्या भविष्याचे विस्कटलेले धागेदोरे हो, हा गुंता सोडवण्यात मी हरवली मी रडली नाही, ओरडली नाही बाबा अजून स्मशानात जळायचाच होता पण, एव्हाना जग बदललं होतं आमचं अनाथपण घालवायला डोक्यावरून हात फिरवायला कुणीच नव्हतं... होते ते फक्त अनाथपण आपण किती एकटे असतो हे सत्य सांगणारं मरण आणि बापासोबत माझ्यातला हळवेपणा जाळणारं सरन अखेर... रात्री मी ही झोपली आई, बहिण झोपली पण एवढ्या रजईतही आम्ही थरथरत होतो का??? का???? आमचं पांघरूण हरवलं होतं... आमची बाप नावाची रजई जळाली होती.. असाच अचानक माझा बाबा मेला आम्हाला अनाथ करून गेला... #संकलित माझा परिस्थितिशी मेळ खाणारी कविता 😢😢😢😢