२०२०- काळा वर्ष

2020 माझा आयुष्यातील काळा वर्ष या वर्षांतील एक ही दिवस मी सुखाचे पाहिले नाहीत आनंदाची भीती वाटायला लागली आहे या काळाने माझा आयुष्यातील माझी सगळ्यात जवळची व्यक्ती हेराऊन घेतली माझा जिवलग असलेल्या सर्वांना मझापासून हेरावल एका पाठोपाठ एक संकटे कोसळत गेली त्या संकटाना सामोरे जात मी आनंदी रहायचेच विसरले एक ही क्षण विसावा नको की शांती नको अश्रू गळायला वेळ सुद्धा नशिबी नाही दुःख सांगावस वाटत, पण वाटून घ्यायला सोबत कुणीच नाही आयुष्याच्या परीक्षे चा काळात मी एकटी पडलीय मदतीचं हाक मारायला म्हणून जवळचं कुणी दिसत नाही मुखोट्यांची धास्ती बसलीय कुणावर विश्वास ठेवायचा कळेनासं झालंय दगा करणारे शेकडो आहेत मदतीला धावणारे कमीच संधीच सोण करणारे तर त्याहूनही अधिक धीट होतेच... पण परिस्थितीमुळे आणखी धीट झाले मातीचा गोळा होते...बाबांनी साकारल.. नी घडवलं त्यांना जसं घडवायचं त्यांचीच सावली बनुन राहिले काळाने मात्र मातीचा दगड केलाय भावना हीन झाले... आता बाकीचे दुःख शुल्लक वाटतात स्वतः ला दुनियेचा काळ या नाझरेवाचून सुखरूप ठेवायचे शिकले शरीराची दमछाक झाली तरी कामे पूर्णत्वाला न्यायाचे समजले प्रेमाने वागून चालणार नाही हे उमगले माणसं कायम बदलत असतात म्हणून वेळोवेळी सावध होऊन पाऊल टाकू लागले बाबांची छोटी लेक कधी मोठी झाली कळलेच नाही मोठ्या जबाबदाऱ्या पदरी पडल्या माझा स्वप्नांचा विसरच पडला स्वप्न पुसून टाकलीत...त्याच वाईट वाटत नाहीये पण पूर्ण करायची झाली तरी तो आनंद बघायला सोबतीला बाबा नाहीये ही खंत मात्र सतत असते मीच का ह्या प्रश्र्नाशी रोजचीच झुंज उत्तर मिळणार नाही हे कळून सुद्धा विचार चक्र मात्र अद्यापही थांबवता आलेला नाही फार एक टेपणा जाणवतो दूर गेलेल्यांची सतत आठवण येत असते आता हे कायमचं झालंय एकटेपणा म्हणतात न आपल्यावर जीव लावणारे फक्तं आई बाबा असतात जिवापाड जपतात एकाची ही साथ संपली की आयुष्य संपल्यागत होत हे दुःख ज्याचं त्यालाच कळत बाकीचे सांत्वन करतात धीर देतात पण त्याने गेलेल्यांची भर निघत नाहीच ती जागा तशीच राहते अपूर्ण.....कायम अपूर्ण!!!

Comments

Popular posts from this blog

*****Kyu*****

बारिश की बूंदे

आजाद है तू