अबोल मनातले
कितीतरी बोलायचं राहुनी गेलं ओठांवर येऊनही ओठात राहिलं कितीतरी स्वप्ने राहुनी गेली माझ्यापासून दूर जणू माझी सावली गेली कितीतरी इच्छा मरुनी गेल्या उरल्या त्या अपेक्षाही माझा निसटून गेल्या आपले म्हणून जवळ कुणीच नाही राहिले आयुष्याचा चौकटीत मी मला एकटीच पाहिले वारंवार अविश्र्वासाच्या नवीन जखमा दिल्या मनातील जुन्या आठवणी उसवल्या गेल्या प्रेमाने जवळ करून त्याला मी स्वतःच हरपून बसले होते ते चांगले दिवस ही आज माझावर रुसले पाठ फेरून माझ्यापासून बदललेली त्याची वाट अश्रूंनी ओल्या पापण्यानी उघडते माझी पहाट माझ्यावर ओसळला दुष्काळ तरी त्याने भरभरून बहराव आयुष्याचा वेलीवर त्याचा पदरी सुखद फुलांच सतत पाऊस पडावं व्याकुळ नेहमीच असेन मी परत त्याचा भेटीची कधीच तुलना होणार नाही कुणाशीच त्याच्या प्रितीची वाटायचं मला , त्यानी वाटेत हाथ माझं धरावं दोघांनी मिळून यशाची शिखर गाठावं सुख असो वा दुःख मिळुनी सामोरं जावं एकमेकांच्या सहवासात आयुष्य हे जगावं परंतू आयुष्य हे नेहमीच सुखद आणि सोपं नसत ज्याची साथ जितकी त्यातच सुख मानायच असत निघून गेला जरी तरी हृदयात होणार नेह...