बाबांचं प्रेम
बाबा तुमच्या प्रेमाची सर कशालाच येत नाही,
आयुष्यात तुमची जागा कुणीच घेत नाही.
विचार येतात मनात सतत आज तुम्ही असतास तर कसं असतं,
अस असतं , तसही असतं, सारं कसं ना सोप्पं असतं.
मनात आलेती गोष्ट लगेच मी तुम्हाला बोलले असती.
माझा मनातली घालमेल तुम्हाला सुद्धा बघवली नसती.
निस्वार्थ प्रेम असतं, खरीखुरी काळजी असती.
न सांगता सुखं दुःख माझी फक्त तुम्हालाच कळाली असती.
इतरांसारखी मी ही मनमुराद स्वप्न बघितली असती.
ती पूर्णत्वास नेण्यासाठी तुमची हिम्मत पाठीशी असती.
मी ही माझा यशाने तुमच आयुष्य आनंदमयी केलं असतं.
तुम्ही निवृत्त झाल्यावर मी माझे मोठे झाले असते.
तुम्हाला सोडून खंबीर होण्याचे दिवस आले नसते.
विसवाच्या काळात आता माझाबरोबर राहायचं असा हट्ट धरला असता.
तुमच्याशी संवाद थट्टा करत आपला वेळ सरला असता.
तुम्ही असता तर मी लहानाचे मोठे झालेच नसते.
तुम्च्याविणा जबाबदाऱ्या सांभाळण्याची वेळ आली नसती.
तुमचा लेकीला घालून बोलायची कुणाची हिंमत झाली नसती.
सारं केलं तरी नाही केल्याची जाणीव कुणी करून दिली नसती.
ना जगण्याची भीती असती ना जगाची धास्ती असती.
आता साऱ्यांना कसं बोलायला अगदी सोपं झालंय.
कारण तुमचं हे गोड लेकरू आता सगळ्यात राहून सुद्धा एकटं पडलंय.
मी रडले तेव्हा आत्मा तुमचा पण तळतळला असेल.
मला त्रास झालेला बघून तुम्हाला पण भरून आले असेल.
का गेलास तुम्ही बाबा आम्हाला अस एकटं करून.
एकदा तरी हाक द्या ना जिथं ही आहात तेवढ्याच दुरून.
तुमची लाडाची लेक
_निधी

🙌🙌🙌🙌🙌🙌
ReplyDelete😔
Delete