घर

किती स्वप्न असतात न आपलं स्वतःचं घर असावं तसच तुम्ही पण बघितली असतील न स्वप्न ती पूर्ण पण केलीत तुमचा मेहनतीने जिद्दीने आज तोच घर आम्हाला असरा देतोय तुम्ही करतात तशी माया करतोय तुम्ही ठेवत होतात तशी सुखरूप असण्याची जाणीव करून देतोय किती आवडीने रंग बदलली या घराची मी लहानाची मोठे झाले इथे आपले सगळे सुख दुःख याच घरा ने बघितले मी कधीच कल्पना केली नव्हती तुमचा वीणा मला इथ राहावं लागेल मला आठवतंय मी सुट्टी घेऊन परत आले होते आणि तुम्ही घराला तुमचा मताप्रमाणे सजवत होता रंग दिले, काही बदल ही केलेत सगळ्या सोयी नीट केल्या जणू जाणवत होत तुम्हाला की तुम्ही गेल्यावर हे सगळ मला अवघड होईल आणि झालं ही पण मी पण तुमची लेक आहे या घराचं घरपण मी कधीच हरवू दिलं नाही आजही तुम्ही या घरात जिवंत असल्याची जाणीव होते तुमचे हास्य अजूनही आहे तुमचे शब्द या भिंतींनी आपल्यात सामावलेले आहेत आपल्या गोड आठवणी आहेत तुम्ही सोडून गेलात तसाच ठेवलंय सगळ नीट नेटकं बरं का तसच आहे सगळ अस वाटतं तुम्ही येणार बघायला या जमत असेल तर रंग तसाच आहे अजून तुम्ही करून गेलात तसाच आपली बाग पण बहरलेली आहे पण तुम्हीच हरवलात कुठे तरी... कुठे गेलात आम्हाला सोडून? आपल्या या घराला सोडून? _निधी

Comments

Popular posts from this blog

*****Kyu*****

बारिश की बूंदे

आजाद है तू