पितृ दिन
एक दिवस अचानक माझे बाबा गेले कुठलीच मनाची तयारी नसतांना, ना आजाराचा सांगावा, ना शरीर जीर्ण झाल्याचे संकेत तरीही... ते गेलेत.. आई रडली, बहिण ओरडली 'जग सारं संपलं' म्हणाली आणि म्हणाली, ‘वाचा बंद झाली कान बहिरे झालेत, नजर गेली सर्व सर्व संपलं....’ नंतर शांत होऊन झोपली. कारण ती ओरडली, रडली व्यक्त झाली परत मला जाणीव झाली अचानक माझे बाबा गेले... बहिणीचे शुष्क डोळे आमच्या पाठीशी कायमची झालेली पोकळी भविष्याचे विस्कटलेले धागेदोरे हो, हा गुंता सोडवण्यात मी हरवली मी रडली नाही, ओरडली नाही बाबा अजून स्मशानात जळायचाच होता पण, एव्हाना जग बदललं होतं आमचं अनाथपण घालवायला डोक्यावरून हात फिरवायला कुणीच नव्हतं... होते ते फक्त अनाथपण आपण किती एकटे असतो हे सत्य सांगणारं मरण आणि बापासोबत माझ्यातला हळवेपणा जाळणारं सरन अखेर... रात्री मी ही झोपली आई, बहिण झोपली पण एवढ्या रजईतही आम्ही थरथरत होतो का??? का???? आमचं पांघरूण हरवलं होतं... आमची बाप नावाची रजई जळाली होती.. असच अचानक माझे बाबा गेले आम्हाला अनाथ करून गेले... वर्ष पूर्ण झालं प्रत्येक क्...