पितृ दिन

एक दिवस अचानक माझे बाबा गेले कुठलीच मनाची तयारी नसतांना, ना आजाराचा सांगावा, ना शरीर जीर्ण झाल्याचे संकेत तरीही... ते गेलेत.. आई रडली, बहिण ओरडली 'जग सारं संपलं' म्हणाली आणि म्हणाली, ‘वाचा बंद झाली कान बहिरे झालेत, नजर गेली सर्व सर्व संपलं....’ नंतर शांत होऊन झोपली. कारण ती ओरडली, रडली व्यक्त झाली परत मला जाणीव झाली अचानक माझे बाबा गेले... बहिणीचे शुष्क डोळे आमच्या पाठीशी कायमची झालेली पोकळी भविष्याचे विस्कटलेले धागेदोरे हो, हा गुंता सोडवण्यात मी हरवली मी रडली नाही, ओरडली नाही बाबा अजून स्मशानात जळायचाच होता पण, एव्हाना जग बदललं होतं आमचं अनाथपण घालवायला डोक्यावरून हात फिरवायला कुणीच नव्हतं... होते ते फक्त अनाथपण आपण किती एकटे असतो हे सत्य सांगणारं मरण आणि बापासोबत माझ्यातला हळवेपणा जाळणारं सरन अखेर... रात्री मी ही झोपली आई, बहिण झोपली पण एवढ्या रजईतही आम्ही थरथरत होतो का??? का???? आमचं पांघरूण हरवलं होतं... आमची बाप नावाची रजई जळाली होती.. असच अचानक माझे बाबा गेले आम्हाला अनाथ करून गेले... वर्ष पूर्ण झालं प्रत्येक क्षणाला मला जाणीव होते मी एकटी असल्याची वाटेल तसा उपयोग करून घेनारे आहेतच मी फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवून आतून लढा देत असते तुम्ही पोरक करून गेलात परत या जमत असेल तर तुम्ही करत होता ती खरीखुरी काळजी कुणीच का करू शकत नाही?? एकदा या , आपल्या लेकीला कवटाळून घ्या तुमचा सहवास हवा आहे, स्मृती नाहीत... 😢😢😢😢 _निधी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

*****Kyu*****

बारिश की बूंदे

आजाद है तू